न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२०) :- पुणे पदवीधर मतदार संघासाठी आतापर्यंत आठ, तर शिक्षक मतदार संघासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत प्रमुख पक्षाचा अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवार (दि. १२) अखेरचा दिवस आहे.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवार (दि. ५) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त महसूल यांच्या कार्यालयांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत शिक्षक मतदार – संघासाठी ६ अर्ज, तर पदवीधर मतदार संघासाठी ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
यात पदवीधर मतदार संघातून सहा ‘ बिग बॉस’मालिकेतील अभिजित बिचुकले, सागर भिसे, गणेश काकडे, विजयकुमार पाटील, कृपाल पलुसकर, निशा बिडवे, मंगेश मुल्हक, संतोष कमाने यांचे अर्ज दाखल झाले आहेत. शिक्षकसाठी जयंत आसगावकर, जितेंद्र पवार, रंजनीश पिसे, सम्राट शिंदे, करणसिंह सरनोबत, दिलीप कचरे यांचे अर्ज दाखल झाले आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी १२ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. १३ नोव्हेंबरला अर्जाची छाननी होऊन उमेदवारांना १६ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.