न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२०) :- सर्वच जगात कोरोना महामारीने थैमान घातला आहे. अनेक महिने घराच्या बाहेर निघणे मुश्कील झाले होते. प्रत्येक व्यक्ती जीव वाचविण्यासाठी काळजी घेत होता. मात्र तशा भयंकर परिस्थितीतही काही जन समाजाची सेवा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत होते. यात डॉक्टर, नर्स, रुग्णालयातील स्टाप, सफाई कामगार, सामाजिक कार्यकर्ते, अनेक सामाजिक संस्था, माझे कुटुंब माझी जवाबदारी सर्व्हे करणारे पिंपळे सौदागर येथील प्रतिनिधी अशा अनेकांनी आपले योगदान समाजासाठी दिले आहे. म्हणून त्यांना कोरोनायोद्धा पुरस्कार पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आले.
चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आले. यावेळी नगरसेविका उषा मुंडे, उन्नती सोशल फॉउंडेशनचे संस्थापक संजय भिसे,उन्नती सोशल फॉउंडेशनच्या अध्यक्षा तथा चिंचवड विधानसभा भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा कुंदा भिसे,उपाध्यक्षा कांचन काटे, सामाजिक कार्यकर्ते विकास काटे अतुल पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पिंपळे गुरव येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या महिला सभासदांनी कोरोना काळात ज्या नागरिकांना जेवणाची गरज होती. अशा नागरिकाना जेवण तयार करून पाठविण्याच काम नगरसेविका उषा मुंडे यांच्यासह ज्योती कोळी, मनीषा हंगरगे, संगीता रावते, सुनिता कुवर, कल्पना शिंदे, यांनी केले. स्वतः चा जीव धोक्यात घालून त्यांनी ही जवाबदारी पार पाडली.
सुनील देवकर, शिवाजी निम्हण, प्रकाष कांबळे यांनी कोरोना काळात या महिलाना बाजारातील साहित्य पुरवठा करणे तयार झलेले अन्न नागरीकांन पर्यंत पोहोचविणे व त्याचे व्यवस्थित वाटप करणे हे काम त्यांनी केले. डॉ दिनेश फोंगसे हे कोरोना काळात ज्याना घराच्या बाहेर पडता येत नाही. किंवा वृद्ध नागरिक आहेत अशा व्यक्तीच्या घरी जाऊन सेवा दिली तर सतिष कांबळे हे ज्या नागरिकाना दवाखान्याची माहिती नाही,त्याना दवाखान्यात घेऊन जाणे,एखाद्याचे बिल कमी करून देणे,बेड उपलब्ध करून देणे यासह अनेक सेवा त्यांनी दिल्या आहेत व योगेश चौधरी यानि देखिल उन्नति फ़ाउंडेशन सोबत कार्य करत जबाबदारी पार पाडलि. अतुल पाटील यांनी प्रस्ताविक केलं तर विकास काटे यांनी आभार मानले.


















