न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) रोजी १५९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १०९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९०८५५ वर पोहोचली आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीतील मृत झालेले ०४ पुरुष रुग्ण व १ स्त्री रुग्ण हे मोशी (४६ वर्षे), रुपीनगर (८८ वर्षे), भोसरी (८० वर्षे), सांगवी (७२ वर्षे), वाकड (६५ वर्षे) तर, हद्दीबाहेरील मंचर येथील ३२ वर्षीय स्त्रीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८७३८४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १५९१ जणांचा मृत्यू झालेला आहे.
















