न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. नोव्हेंबर २०२०) :- पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवड महाविकास आघाडीचे नेते एकत्र येत त्यांनी नुकतीच प्रचारासंदर्भात बैठक घेतली.
पुणे पदवीधरमधून राष्ट्रवादीचे अरुण लाड तर शिक्षक मतदारसंघातून कॉंग्रेसचे जयंत आसगावकर निवडणूक लढवित आहेत. सुमारे अर्धा तासाच्या या बैठकीत विधानपरिषदेचे उमेदवार विजयी करण्यावर तसेच अधिकाधिक मतदान घडवून आणण्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे व कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन साठे उपस्थित होते.