- कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित..
- देवेंद्रजींची वैशिष्ट्यपूर्ण भेट माझ्यासाठी स्मरणीय – अनुप मोरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२०) :- ”मला अनुप मोरेंकडे जायचे आहे”, असे सांगत चक्क त्यांनी आपली बैठक आटोपती घेऊन प्राधिकरणाकडे कूच केली. अनं काही वेळातच प्राधिकरणातील अनुप मोरे यांचे जनसंपर्क कार्यालय त्यांनी गाठले. ते कोण? तर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस. लवाजम्यासह कार्यालयात दाखल होताच चक्क… भाजपचे अनुप मोरे भारावले. त्यांनी व त्यांच्या आई नगरसेविका शैलजाताई मोरे यांनी त्यांचे स्वागत करीत, आदराने त्यांना आपल्या कार्यालयात नेले.
पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख व पुणे शिक्षक मतदार संघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आले होते. त्याआधी ते एका खासगी कार्यक्रमासाठी प्राधिकरणात आले असता एका सामान्य कार्यकर्त्याच्या कार्यालयास भेट देऊन त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले होते.
याप्रसंगी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांना छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांची प्रतिकृती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेशदादा लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके, पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्राम देशमुख, हर्षवर्धन पाटील, नगरसेविका शैलजाताई मोरे, प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसेवक शीतल उर्फ विजय शिंदे, प्रदेश सचिव अमित गोरखे, केतन जावूळकर, समीर जावळकर, नरेंद्र येलकर, शीतल सिंग, निनाद चिखलीकर, सागर घोरपडे, मंडल अध्यक्ष विजय शिनकर, सचिन कुलकर्णी, सलीम शिकलगार, मनोज देशमुख, आनंद देशमुख, जयेश मोरे, आशिष राउत, प्रशांत बोरा, आर. एस. कुमार, प्रसून अष्टेकर, मीनाक्षी शहाणे, नीलिमा कोल्हे, वैशाली कुलकर्णी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
फडणवीस यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, अनुप मोरेंच्या आई-वडिलांची आस्थेने चौकशी केली. प्रभागातील विकासकामांची व शहरातील चालू घडामोडीवर चर्चा करून माहिती घेतली. नगरसेविका शैलजाताई मोरे व अनुप मोरे यांच्या अफाट कार्याने प्रभावित होऊन पाठीवर कौतुकाची थाप दिली. विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवा, कार्यकर्त्यांना बळ मिळाले पाहिजे, सर्वांनी एकजुटीने पक्षाचा अजेंडा राबवून भाजपची पताका अशीच उंचावत ठेवा, असे मार्गदर्शन करीत कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत केला.
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज माझ्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. त्यांच्या भेटीने माझ्यासारख्य एका सामान्य कार्यकर्त्यात नवउमेद जागृत झाली आहे. राज्यातील अगदी शेवटच्या घटकाच्या उत्थानासाठी ते सदैव कटिबद्ध असतात. आज देवेंद्रजींकडून माझ्यासारख्या शेवटच्या घटकाला एक वैशिष्ट्यपूर्ण भेट प्राप्त झाली आहे. ती सदैव माझ्यासाठी स्मरणीय राहील.
– अनुप मोरे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष…