- ‘ठाकरे यांनी भेटीला येऊ नये’, पंतप्रधानांकडून सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२०) :- करोनावरील लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिटय़ूट आणि जिनोव्हा बायो फार्मासिटिक्युअल्स कंपनीला भेट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी (२८ नोव्हेंबर) पुणे दौऱ्यावर येणार आहेत.
मोदींच्या स्वागताला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल अथवा मुख्यमंत्री यांनी मोदींच्या स्वागताला येऊ नये अशा सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पुण्याला जाणार नाही.
राजशिष्टाचारानुसार पंतप्रधान एखाद्या राज्यात गेल्यास तेथील मुख्यमंत्री त्यांच्या स्वागतासाठी येतात. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान कार्यालयाकडून स्थानिक प्रशासनाला स्वागत समारंभ आणि भेटीगाठी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुण्यात पंतप्रधानांच्या स्वागताला जाणार नाहीत, अशी माहिती राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.


















