- विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२०) :- दहावी, बारावीच्या परीक्षा नेमक्या कधी होणार, कशा होणार, हे अद्याप स्पष्ट नसल्याने पालक, विद्यार्थी, संभ्रमात आहेत. दरवर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये दहावी – बारावीच्या परीक्षा होत असतात. यंदा कोरोनामुळे देश मार्चपासून बंद आहे.
त्यामुळे ऑनलाइनव्दारे शिक्षण सुरू करण्यात आले आहे. यंदा परीक्षा घेण्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. शाळा कोरोनाची परिस्थिती पाहता परीक्षा पुढे ढकलण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मार्चपासून विद्यार्थी ऑनलाइनच्या माध्यमातून अभ्यास करत आहेत. ऑनलाइन शिक्षण नवीन असल्याने अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास अडचणी आल्या आहेत.
बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाखेचा अभ्यास ऑनलाइन मिळण्यास अडचणी आल्या आहेत व कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने परीक्षा नेहमीसारख्या होतील का ऑनलाइन होतील, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थ्यापुढील शिक्षण कोणत्या शाखेत घ्यायचे याचे नियोजन करीत असतात. यंदा मात्र अनेक विद्यार्थी संभ्रमात आहेत.
















