न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२०) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावला यांनी दिली. करोनाच्या लशीच्या तिसऱ्या ट्रायलवर आमचं सगळ्यांचं लक्ष आहे अशी माहितीही अदर पुनावाला यांनी दिली.
करोनावरच्या लशीचं वितरण पहिल्यांदा भारतातच होणार अशीही माहिती अदर पुनावाला यांनी दिली आहे. लशीच्या तयारीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपूर्ण माहिती दिली. लोकांपर्यंत लस पोहचवण्याची तयारी आम्ही करतो आहोत. सर्व सामान्य जनतेला परवडेल अशीच लशीची किंमत असणार आहे असंही पुनावाला यांनी म्हटलं आहे. जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध करणार असंही पुनावाला यांनी स्पष्ट केलं.