- लसीमुळे करोनाचा प्रसार आटोक्यात, रुग्णालयात जाण्याची शक्यताही कमी – अदर पुनावाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२०) :- येत्या दोन आठवड्यात सिरम इन्स्टिट्युट भारत सरकारकडे तातडीच्या परवान्यासाठी अर्ज करणार आहे, अशी माहिती सिरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली. या लशीचं वितरण हे त्यानंतर कोव्हॅक्स देश म्हणजेच अफ्रिकेतील देशांमध्ये केलं जाईल, असंही अदर पुनावालांनी स्पष्ट केलं.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिरम इन्सिट्युटला भेट दिली. यानंतर सिरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.
सिरम इन्सिट्युटमध्ये ज्या लशीची निर्मिती केली जाते आहे, ती लस चांगली आहे. ही लस घेतलेल्या व्यक्तीला करोना झाला तर, रुग्णालयात दाखल करावं लागणार नाही. तसेच करोनाचा प्रसार ६० टक्क्यांपर्यंत कमी करता येणार आहे, असा विश्वास यावेळी अदर पुनावाला यांनी व्यक्त केला.