न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसें.) :- वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी अत्यंत मानाच्या असलेल्या या निवडणुकीसाठी रविवार (दि. ९) रोजी सकाळी शहरातील २७ डेपोवर मतदान प्रक्रिया पार पडली. पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या विश्वस्त पदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष विजय पारगे यांच्या नेतृत्वाखाली ओम साईराम पॅनेलने विजय संपादन केला आहे. अगदी खेळीमेळीत झालेल्या या निवडणुकीत ओम साईराम पॅनेलचे सर्वच्या सर्व १५ उमेदवार बहुमताने विजयी झाले आहेत.
अध्यक्ष विजय पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता पिसे, अरुण निवंगुणे, अनंता भिकुले, प्रवीण माने, संग्राम गायकवाड, संजय भोसले, वसंत घोटकुले, रोहित गणेशकर, संदीप शिंदे, वैगनाथ काळे, सुनील पवार, जितेंद्र मोरे, आनंद वाळके, गोरख फुलसुंदर यांनी प्रचंड बहुमतांनी विजय मिळवीला आहे.
पुणे वृत्तपत्र संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष विजय पारगे यांचा ओम साईराम पॅनेल व स्वामी समर्थ पॅनल समोरासमोर उभे होते. यात विजय पारगे यांच्या ओम साईराम पॅनेलने बाजी मारली असून, सर्वच्या सर्व १५ जागांवर पॅनेलच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
गेल्या पंचवार्षिकीमध्ये सर्वसामान्य विक्रेत्यांचा विकास हाच केंद्रबिंदू ठरवून मी व माझ्या सहकाऱ्यांनी काम केले आहे. या कामाची पोच पावती हा आजचा निकाल आहे. आगामी काळात केवळ विक्रेत्यांना सोबत घेऊन, अटकेपार झेंडा फडकवणार आहे.
विजय पारगे, अध्यक्ष पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ












