- या उमेदवारांची विजयाकडे वाटचाल..
- उरली केवळ विजयाची औपचारिकताच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १६ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून भाजप ८३ जागांवर, राष्ट्रवादी ३७ जागांवर, शिवसनेने ७ तर इतर १ जागांवर आघाडीवर आहेत. दरम्यान विविध प्रभागांतील उमेदवारांना मिळालेल्या मतांमुळे निकालाचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे.
खालीलप्रमाणे प्रभागनिहाय विजयाकडे वाटचाल करणाऱ्या उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत. आता केवळ विजयाची औपचारिकताच उरलेली आहे.
प्रभाग क्रमांक १ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास साने यांना १३,७९१ मते, भाजपच्या सोनम मोरे यांना १४,४७५ मते, भाजपच्या शीतल यादव यांना १३,४१७ मते तर राष्ट्रवादीचे यश साने यांना १४,४५५ मते मिळाली आहेत. प्रभाग क्रमांक २ मधून भाजपच्या सुजाता बोराटे यांना ८,३७३ मते मिळाली आहेत.
प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपच्या सारिका गायकवाड १९,३६६, नितीन काळजे २१,१२०, अर्चना सस्ते १९,७३० आणि सचिन तापकीर १९,७६२ मते मिळवून आघाडीवर आहेत. प्रभाग क्रमांक ४ मधून भाजपच्या श्रुती डोळस १६,०१५, सुरकुले कृष्णा १३,५१९, हिराबाई घुले १५,९५१ आणि उदय गायकवाड १५,१२५ मते मिळाली आहेत.
प्रभाग ५ मधून भाजपचे जालिंदर शिंदे ११,४३८ मते मिळवून पुढे आहेत. प्रभाग ७ मधून भाजपच्या सोनाली गव्हाणे १९,३०९ तर राणीमाई पठारे १२,५०८ मते मिळाली आहेत. प्रभाग ८ मधून भाजपच्या नम्रता लोंढे यांना १०,२५२ मते मिळाली आहेत.
प्रभाग ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला १०,५३५ तर राहुल भोसले यांना ११,९५३ मते मिळाली आहेत. प्रभाग ११ मधून भाजपचे कुंदन गायकवाड १०,४३९ आणि निलेश नेवाळे १२,४७४ मते मिळवून आघाडीवर आहेत. प्रभाग १२ मधून शीतल वर्णेकर यांना १२,४३६ मते मिळाली आहेत.
प्रभाग १४ मधून भाजपचे कैलास कुटे ९,८०५ तर राष्ट्रवादीचे प्रमोद कुटे ९,८३८ मते मिळाली आहेत. प्रभाग १५ मधून भाजपचे उमेदवार ७,३५०, भाजपच्या शैलजा मोरे ९,९६३, शर्मिला बाबर ८,३५० आणि अमित गावडे ८,४३९ मते मिळाली आहेत. प्रभाग १६ मधून शिवसेनेच्या ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे (१४,५३४) आणि निलेश तरस (१२,७३१) यांना मोठ्या प्रमाणात मते मिळाली आहेत. प्रभाग १७ मधून राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर ८,१४६ तर शेखर चिंचवडे ९,५०८ मते मिळाली आहेत.
प्रभाग १८ मधून भाजपच्या अपर्णा डोके १५,३१३, मनीषा चिंचवडे १३,८६७ तर राष्ट्रवादीचे अनंत कोऱ्हाळे १२,०४२ मते मिळाली आहेत. प्रभाग २५ मधून भाजपचे कुणाल वाव्हळकर ११,९१५, रेश्मा भुजबळ १६,४९१, श्रुती वाकडकर १४,६८१ आणि राहुल कलाटे १७,२८४ मते मिळाली आहेत. प्रभाग २६ मधून भाजपचे विनायक गायकवाड १८,५८६, आरती चोंधे १५,७४६, स्नेहा कलाटे १९,५८६ आणि संदीप कस्पटे १७,५८० मते मिळाली आहेत. प्रभाग २८ मधून भाजपचे शत्रुघन काटे १२,११६, अनिता काटे १०,२३५, कुंदाताई भिसे १२,१७२ तर राष्ट्रवादीचे नाना काटे १२,१३९ मते मिळाली आहेत.
प्रभाग २९ मधून भाजपच्या रविना अंगोळकर १०,८०६ आणि शकुंतला धराडे १०,०९९ मते मिळाली आहेत. प्रभाग ३१ मधून भाजपचे नवनाथ जगताप यांना ८,२३१ मते मिळाली आहेत. ही सर्व आकडेवारी प्राथमिक स्वरूपाची असून अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे.











