- भाजपची सर्वाधिक जागांवर आघाडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १६ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या २०२५-२६ या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सादर करण्यात आलेल्या प्राथमिक माहितीनुसार भारतीय जनता पार्टीने स्पष्ट आघाडी घेतली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार भाजपने एकूण ८२ प्रभागांमध्ये आघाडी मिळवत निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये भाजप उमेदवारांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
अ.क्र. पक्षाचे नाव प्रभागनिहाय आघाडी
१ भारतीय जनता पार्टी ८२
२ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ३५
३ शिवसेना ९
४ अपक्ष १
५ एनसीपी शरद पवार १
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीला या निवडणुकीत ३५ प्रभागांमध्ये आघाडी मिळाली असून, पक्षाला काही ठिकाणी समाधानकारक यश मिळाले आहे. तर शिवसेना ९ जागी आघाडीवर आहे. तर, राष्ट्रवादी शरद पवार गट १ आणि एक अपक्ष देखील आघाडीवर आहेत.
शिवसेना ठाकरे गट, मनसे, वंचित बहुजन आघाडी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, नॅशनलिस्ट रिपब्लिकन पार्टी, तसेच इतर स्थानिक व प्रादेशिक पक्षांनाही या टप्प्यावर खाते उघडता आलेले नाही. अपक्ष उमेदवारांनाही मोठ्या संख्येने आघाडी मिळालेली नसल्याने मोठ्या पक्षांचेच वर्चस्व या निवडणुकीत राहिल्याचे दिसून येत आहे.
ही आकडेवारी प्राथमिक स्वरूपाची असून अंतिम निकालांमध्ये बदल होण्याची शक्यता निवडणूक प्रशासनाने व्यक्त केली आहे. तरीही सध्याच्या चित्रावरून पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपचे स्थान अधिक मजबूत होत असल्याचे संकेत मिळत आहेत. अंतिम निकालांकडे ससर्वांचे लक्ष लागले आहे.











