- कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती तर, नगरसेवकांनी विरोधी घोषणा देत दिला भारत बंदला पाठींबा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२०) :- कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरयाणा येथील शेतकऱ्यांचे दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू असून आज ‘भारत बंद’ ची हाक त्यांनी दिली आहे. त्याला अवघ्या देशातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचे लोन पिंपरी-चिंचवड महापालिकेत देखील पसरले होते.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे व कर्मचाऱ्यांनी यांनी काळ्या फिती लावून कामावर हजर राहत, भारत बंदला पाठिंबा घोषीत केला आहे. तर, आज पालिकेची सर्वसाधरण सभा असल्यामुळे तिथे देखील या बंदचे लोन पहायला मिळाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करीत, शेतकरीविरोधी कायद्यांचा निषेध व्यक्त केला. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी काळा पोषाख परिधान करून तसेच माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, माजी महापौर मंगला कदम व नगरसेवक, पदाधिका-यांनी भाजप सरकार विरोधी घोषणा देत सभागृहात प्रवेश केला.















