न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने देशासाठी प्राणाचे बलिदान करणारे हुतात्मा बाबू गेनू यांच्या शहिददिनी त्यांचे प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.