- पालिकेकडून निगडीत दोन तर भोसरी पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२०) :- पालिकेच्या परवानगीशिवाय बांधकाम केल्याबाबत निगडी पोलीस ठाण्यात दोन तर भोसरी पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोहेल नूर मोहम्मद पठाण, दामजी हिरजी चौहाण, विजय सुराम चौधरी (सर्व रा. आकुर्डी) यांच्यासह एका महिलेच्या विरोधात गुन्हे निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
अरिफ गडुभाई तांबोळी (वय ५०, रा. कासारवाडी), भीमाशंकर परमेश्वर कामटकर (वय ३८, रा. धावडेवस्ती, भोसरी), बाबाजी क्षीरसागर (वय ५५), अशोक सोपान क्षीरसागर (वय ३४, रा. पसायदान कॉलनी, भोसरी), नथुराम बाबाजी काजुळकर (वय ४६, रा. सावतनगर, भोसरी), बबन बाजीराव टेमगिरे (वय ३८, रा. सिद्धिविनायक कॉलनी, भोसरी) यांच्यासह महिलांच्या विरोधातही भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपींनी अनधिकृतपणे बांधकाम केले. त्याबाबत महापालिकेने त्यांना नोटीस बजावली. त्या नोटिशीनुसार आरोपींनी त्यांचे अनधिकृत बांधकाम काढून घेणे बंधनकारक होते. मात्र, आरोपींनी त्याची अंमलबजावणी केली नाही. याबाबत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.