न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२०):- लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महापालिकेचे रुपीनगर तळवडे येथील नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी नेत्र चिकित्सा शिबिरामध्ये डोळे तपासणी केलेल्या नागरिकांना मोफत चष्मे वाटप व महारक्तदान शिबीराचे सोनीगरा मैदान, रूपीनगर येथे आयोजन केले. या शिबिरास नागरिकांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला.
राज्यात दररोज साधारणतः पाच हजार रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते. विविध शस्त्रक्रिया आणि पीडित रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते. कोरोना प्रादुर्भावामुळे नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबीराना फटका बसला व परिणामी राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक प्रविण भालेकर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. शिबीरासाठी नागरिकांचा व विशेषतः तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. त्यामुळे १६० बॅग रक्त संकलित झाले.
या शिबिरामध्ये पिंपरी चिंचवड ब्लड बँकेचे मकरंद शहापूरकर व डॉक्टरांच्या पथकाकडून आवश्यक तपासण्या तसेच स्वछता व फिजिकल डिस्टनसिंग अश्या विविध नियमांचे पालन करून १६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच नेत्र चिकित्सा शिबिरामध्ये डोळे तपासणी केलेल्या १५० महिलांना नगरसेवक प्रवीण भालेकर यांच्या माध्यमातून मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
या महारक्तदान शिबिरास खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे , नगरसेवक अजित गव्हाणे, पंकज भालेकर, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे आदी मान्यवरांनी भेट दिली.
या प्रसंगी खासदार अमोल कोल्हे म्हणाले, पवारसाहेबांचा या वर्षीचा वाढदिवस म्हणजे ८ दशके कृतज्ञतेची, त्यामुळे विवीध सामाजिक उपक्रम्र आयोजित करण्यात आले आहेत. प्रवीण भालेकर यांनी महारक्तदान शिबिर व मोफत चष्मे वाटप उपक्रम राबवुन सामाजिक बांधिलकी जपली आहे. या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरसेवक प्रवीण भालेकर युवा मंच व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनमोल सहकार्य केले.