न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. १७ डिसेंबर) रोजी १७१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ११६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ०२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९४९४८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९१६०९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७२६ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेला एक पुरुष थेरगाव (५२ वर्षे) व एक स्त्री चिंचवड (५१ वर्षे) येथील रहिवासी आहे.