- हॉटेल सहा महिण्यासाठी होणार सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२०) :- आयटी हब हिंजवडीमधील हॉटेल ग्रँड मन्नतवर काही महिन्यांपासून हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट सुरू होते. त्यावर गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने काही दिवसांपूर्वी छापा टाकून चार तरुणींची सुटका करत चार जणांवर गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी पाठपुरावा करत संबंधित हॉटेल हे सहा महिण्याकरिता सील करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे पाठविण्यात आला होता.
त्यानुसार, कायदेशीर तरतुदी तपासून सेक्स रॅकेट चालत असलेले हॉटेल सहा महिने बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले आहेत. त्यानुसार आज हिंजवडी पोलिसांनी ते हॉटेल सील केले आहे. हिंजवडी परिसरात असे गैरप्रकार आढळल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी नागरिकांना केले आहे.















