न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. ३१ डिसेंबर) रोजी १२५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ४ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – आकुर्डी (६५ वर्षे) ०१ स्त्री – चिंचवड (८२ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – आंबेगाव (४५ वर्षे), ०१ स्त्री – निमगाव (६३ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील २६८ प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी १४ प्रवाशी भारतात परतलेले नाहीत. ५० प्रवाशी बाहेरगावी गेलेले आहेत व १६ प्रवाशांचा २८ दिवसांचा कालावधी पुर्ण झालेला आहे. उर्वरीत १८८ प्रवाशांची चाचणी केली असून त्यापैकी १५९ नकारात्मक असून ६ अहवाल कोविड सकारात्मक आहे. उर्वरित २३ अहवाल प्रलंबित आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९६६०८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९३३६५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७५६ जणांचा मृत्यू झालेला आहे.












