न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखलसे (कामशेत) (दि. १४ डिसें:) :- येथील आबेदा ईनामदार काॅलेज, आझम कॅम्पस पुणे या काॅलेजच्या विद्यार्थ्यांचे हिवाळी शिबिर उत्साहात व समाजोपयोगी विविध उपक्रमांसह यशस्वीरीत्या संपन्न झाले.
यावेळी सरपंच मनोरमा साळवे, संदीप काजळे, शिवशंकर काजळे, ग्रामसेवक आबनावे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराच्या समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांना चिखलसे जिल्हा परिषद शाळेचे पदवीधर शिक्षक डाॅ. सुनिल साठे सरांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी पंडित नेहरू व डाॅ. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेऊन देशाची बहुमुल्य सेवा करावी. अभ्यास, वाचन याद्वारे आपले ज्ञानाचे भांडार समृद्ध करावे तसेच डाॅ. अब्दुल कलाम यांच्या अग्नीपंख या पुस्तकातून प्रेरणा घेऊन प्रगतीच्या आसमंतात गरुडझेप घ्यावी, नवनवीन संशोधन करुन आपल्यातील सर्जनशीलतेला वाव देऊन देशाच्या विकासात बहुमोल योगदान द्यावे असे मार्गदर्शन डाॅ. सुनिल साठे यांनी विद्यार्थ्यांना केले तसेच त्यांच्या समर्पित कार्याबद्दल विद्यार्थी व प्राध्यापक यांचे अभिनंदन करुन आभार मानले.
चिखलसे गावचे माजी उपसरपंच विजय काजळे यांनीही प्राचार्य शैला मोटवानी व सर्व प्राध्यापक यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार केला. या शिबिरात विद्यार्थ्यांनी शालेय बांधकामात श्रमदान केले तसेच ग्रामस्वच्छता अभियान राबविले. शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तसेच विविध आजार व त्यावरील उपाययोजना यांची माहिती असलेल्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत काय उपाययोजना करावी हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखविले. प्राचार्य शैला मोटवानी यांनी चिखलसे हे गाव दत्तक घेतले असून येत्या ५ वर्षात गावात अधिकाधिक विकास कामे करुन गावच्या सर्वागिण विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणार असल्याचे सांगितले.












