- पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनाही लसीकरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२१) :- केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांनुसार कोविड १९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. मंगळवार, (दि.०९) रोजी पासून फ्रन्ट लाईन वर्कर यांना कोविड १९ लसीकरण करण्यास सुरवात करण्यात आलेली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रेमलोक पार्क दवाखान्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयामधील पोलिस अधिकारी व कर्मचारी या फ्रन्ट लाईन वर्कर यांना कोविड १९ लसीकरण करण्यात आले.
यावेळी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. सुनिल जॉन, वैद्यकिय अधिकारी डॉ. मुलशंकर शर्मा, डॉ. अभिजित सांगडे, पी.एच.एन. प्रियंका सर्वज्ञ आदी दवाखान्यामधील कर्मचारी उपस्थित होते.


















