- गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२१) :- सहदेव मारुती सोळके वय २७ रा. सावनगिरा ता.निलंगा जि.लातुर हा दहा वर्षापुर्वी त्याचे गावातुन पळून येवून पुण्याला विश्रांतवाडी येथे हॉटेलमध्ये कामाला लागला होता. त्याला दारुचे व्यसन लागलेने तेथील कामधंदा सोडून फिरत होता. काही दिवसानंतर पुन्हा त्याने चिंचवड स्टेशन येथील शंकर झोंडे उर्फ काक्या याचे जग्गुभाई हॉटेल मध्ये वेटर म्हणुन कामाला सुरवात केली. त्या ठिकाणी त्याची ओळख आझाद मूल्लानी व शंकर ब्रम्हदेव शिंदे रा. ओटास्किम यांचेशी झाली होती. ते ऐकमेकांचे चांगले मित्र झाले होते. शंकर झोडे याचेशी पैशाचे व्यवहारातुन सहदेव सोळके, आझाद मुल्लानी यांनी शंकर झोंडे याचा ऑगस्ट २०१७ मध्ये वाहनाने ठोकर मारुन अपघात घडवून आणला. काही दिवसांनी तो खून असल्याचे उघड होवुन खुनाच्या गुन्हयात आझाद मुल्लानी व सहदेव सोळंके यांना अटक होवून येरवडा जेलला होते. ते जामीनावर सुटल्यानंतर सहदेव हा सैरावैरा होवून कोणावरही दादागिरी करु लागला होता. त्यामध्ये त्याचा मित्र शंकर ब्रम्हदेव शिंदे याला सुद्धा सतत दारु पिवुन शिवीगाळ करणे, लोकांमध्ये त्याचा अपमान करणे, दादागिरी करणे असे सहदेव हा करीत असल्याने शंकर शिंदे त्याचेवर होता. शंकर शिंदे याने सहदेव यास समजावुन सांग नाहीतर मी त्याला ठार मारणार असे आझाद मुल्लानी यास सांगितले होते. परंतु सहदेव याचे वागण्यात काहीही बदल झाला नाही.
सन २०१८ मधील ऑगस्ट महीन्याचे सुरवातीला सहदेव मारुती सोळंकी हा शंकर ब्रम्हदेव शिंदे याचेवर सतत दादागिरी करुन दारु पिवुन शिविगाळ करीत असल्याचे रागातुन शंकर ब्रम्हदेव शिंदे वय २७ वर्ष धंदा-स्क्रेप खरेदी विक्री रा. मुळ लिमगाव जि. सोलापुर सध्या राहणार एल १०/१, सोमेश्वर मंदीराचे पाठीमागे मिलींदनगर सेक्टर नंबर २२ ओटास्किम निगडी याने त्याचे साथीदार रवि अशोक मोरे वय २७ वर्षे घंदा- खाजगी नोकरी रा.बी / ३/१ राजनगर ओटास्किम निगडी पुणे, मुळगाव केडगाव चौफुला जि.पुणे. अमोल बसवराज वाले रा. मिलींदनगर, राज्या उर्फ मेघराज संजय वाले रा. मिलिंदनगर यांना दारु पिणेसाठी बोलवून घेवून सहदेव मारुती सोळंकी यास ठार मारणेचा कट आखला. सहदेव यास बोलावुन घेवून दारु पाजली
त्यानंतर आझाद मूल्लानी याचे वापरातील लाल रंगाच्या झायलो गाडी नंबर एम १८५२ मधुन सहदेव यास बाहेर जायचे आहे, असे सांगुन झायलो गाडीतुन एमआयडीसीच्या मैदानात घेवून जावून चौघांनी मिळुन शिविगाळ करुन मारहाण केली. त्यामध्ये सहदेय याने सुध्दा हातपाय मारल्याने शंकर शिंदे याने सहदेव सोळंकी याचे गळयात नॉलायनची रस्सी टाकून रवि मोरे याने त्याचे दोन्ही हात धरले, मेघराज या दोन्ही पाय दाबून धरुन शंकर शिंदे अमोल वाले मोरे याने त्याचे दोन्ही हात धरले, मेघराज याने दोन्ही पाय दाबुन धरुन शंकर शिंदे व अमोल वाले यांनी नाईलाईनची रस्सी दोन्ही बाजुने जोराने ओढून सहदेव याचा गळा आवळुन ठार मारले
दुस-या दिवशी रात्री सहदेव याचे प्रेत परंदवाडी ते बेबेड ओव्हळ गावचे मधील नदीचे पुलावर घेवून जावुन प्रेताचे छाती पोटावर दगड बांधुन वाहते पाण्यात फेकून देवून विल्हेवाट लावली. पुरावा नष्ट केला. तब्बल दहा ते बारा दिवसांनी मृतदेह पाण्यातुन बाहेर आला त्यावेळी तो पूर्णपणे कुजलेल्या सडलेल्या अवस्थेत होता. त्याचे पैंटचे खिशात मिळालेल्या पॅनकार्डवरुन तो सहदेव मारुती सोळंकी याचा असल्याचे निष्पन्न झाल्याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाणेकडे अकस्मात मयताची नोंद झाली. आरोपीत यांची खुनाचा गुन्हा लपल्याची खात्री झाल्याने कोणाला काही एक माहीती झाले नसल्याचे आविर्भावात फिरु लागले सदर घटनेला तब्बल अडीच वर्षे लोटली होती.
दिनांक ०८/०२/२०२१ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील स्टाफ वाहनचोरीचे गुन्हयातील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकींग करीत असतांना पोलीस हवालदार शिवानंद स्वामी यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकरवी बातमी मिळाली कि, सहदेव मारुती सोळंकी याचा शंकर ब्रम्हदेव शिंदे ,रवि अशोक मोरे, अमोल वाले , मेघराज वाले सर्व रा. मिलींदनगर ओटास्किम निगडी यांनी रस्सीने गळा आवळून खुन केला व प्रेत बेबेड ओव्हळ जवळील नदीचे पाण्यात फेकून दिले अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली अंकुश चौक परिसरात सापळा लावून शंकर शिंदे व रवि मोरे यांना गुन्हे शाखेकडील पथकाने शिताफीने अटक केली. आरोपींना चौकशीकामी गुन्हे शाखा युनिट २ कार्यालयात आणून विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांनी सहदेव मारुती सोळंकी याचे खुनाची कबुली देवुन घटनास्थळ दाखविले. शिवानंद स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तळेगाव दाभाडे पोलीस ठाणेत खुनाचा करुन खून करणे, पुरावा नाहीसा करणे याबाबत गुन्हा करणेत आल आला आहे. आरोपी शंकर ब्रम्हदेव शिंदे, रवि अशोक मोरे यांना गुन्हयाचेकामी हजर करण्यात आले असून अमोल वाले व मेघराज वाले वाले विरुद्ध मोका कायद्यान्वये कारवाई सुरु असल्याने अटकेत आहेत. गुन्हयाचा अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलीस ठाणेकडून सुरु आहे.