न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. ०९ फेब्रुवारी) रोजी १०२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील चिंचवडमधील एक ६० वर्षीय पुरुष व चिखलीतील ७१ वर्षीय, चऱ्होलीतील ५८ वर्षीय स्त्रीयांचा मृत्यू झालेला आहे. तसेच हद्दीबाहेरील मंचरमधील ४५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०११११ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९७५१५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८२५ जणांचा मृत्यू झालेला आहे.


















