- लग्नसमारंभात होणारा अनाठायी खर्च टाळून समाजातील पिडीत, वंचित घटकांना दिला मदतीचा हात!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. १८ डिसें.) :- लग्न समारंभ म्हटलं की वधू वराबरोबरच त्यांचे कुटूंब व नातेवाईकामध्ये देखील आयुष्यातील ऐक आनंदाचा सोनेरी क्षणच असतो. पण य़ा आनंदात दिनदुबळ्या, अनाथ, अंध-दिव्यांग व सामाजीक मागासलेल्या घटकाला देखील आपल्या आनंदा ऐवढाच आनंद मिळवून देण्याचे काम क्वचितच कुणीतरी करत असते. त्यातीलच ऐक नाव म्हणजे मोशीतील बारणे कुटूंब. आपल्या भावाच्या लग्नात मनसोक्तपणे वरीलप्रमाणे सर्व घटकाला सहभागी करुन सामाजीक बांधिलकी जपण्याबरोबरच पर्यावरणाचाही संदेश देण्याचा एक नवा पॅटर्न उद्योजक संतोष बारणे यांनी शहराला घालून दिला आहे.
त्यांचे बंधू अतिश बारणे यांचा विवाह राजेंद्र साठे यांची मुलगी श्वेता साठे हिच्याशी मोशी येथे नुकताच वैशिष्ठपुर्ण पध्दतीने पार पडला. या विवाह सोहळ्याकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले. बारणे य़ांनी आपल्या या लग्नात समाजातील सर्व प्रकारच्या घटकात काम करणा-या संस्थाना भरीव स्वरुपाची अर्थिक मदत करुन त्यांच्या कामांना प्रोहत्सान देण्याचा अभिनव प्रयत्न केला आहे. यासाठी आपल्या लग्नातील अनेक खर्चाला बगल देत. अनाथ मुलांचा सांभाळ करणा-या विकास अनाथ आश्रम संस्था, राज्यातील आत्महत्यग्रस्त शेतकरी कुटूंबातील मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात सामिल करणारी नेहवन संस्था, मोशीतील अंध, दिव्यांग व गरजू मुलांसाठी नेहमीच अग्रसेर असलेला जाणीव परिवार अशा या सर्व सस्थांच्या कार्याचा उचित गौरव करीत त्यांना बारणे परिवाराकडून संतोष बारणे यांनी लाखो रुपयाची भरिव आर्थिक मदत कली आहे.
या मदतीमुळे या संस्थावर अवलंबून असलेल्या शेकडो निराधार व गरजू मुलांच्या जीवनाला एक झळाळी मिळाली असून, त्यांच्या या कार्याची सर्वच स्थरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. हे असून देखील, बारणे कुटूंब मुख्यमंत्री सहायतानिधी देण्यासही विसरले नाहीत. तर, यापुढे जाऊन त्यांनी शहरातील पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास पाहता लग्न समारंभात आलेल्या हजारो पाहुण्यांना हापुस आंब्यांचे रोपे देऊन पर्य़ावरणाचा समतोल साधण्यासाठी अतिशय मोलाची साद देखील घातली आहे. अशा पध्दतीने साजरा होणारा हा शहरातील पहिलाच लग्न सोहळा असल्याचे बोलले जात आहे.












