न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १९ डिसें.) :- शिवतीर्थनगर-पौड रोड, कोथरूड येथे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या कोथरूड पुणे विभागीय शाखेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त पोलीस मित्र मेळावा संपन्न झाला.
मेळाव्यास प्रमुख उपस्थिती आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेविका छाया मारणे, श्रद्धा पाठक, अल्पना वरपे, पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी, पोलीस उपनिरीक्षक प्रविण जर्दे, सामाजिक कार्यकर्ते अजय मारणे, आशिष कांटे, डॉ. संदीप बुटाला, संतोष अमराळे, गोरखकाका जोशी, महाराष्ट्र राज्य समिती अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, महिला अध्यक्षा अर्चना घाळी, कोथरूड विभाग अध्यक्ष संदीप कुंबरे, प्रदीप पिलाने, उमेश कांगुडे, सुनिल सुतार, बी. के. मोडक, मंगेश घाग, राम सुर्वे, संदीप सकपाळ, राजकुमार कांबिकर, संतोष चव्हाण, अशोक शेलार यांची होती.
याप्रसंगी आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, “पुणे शहराची स्मार्ट सिटीमध्ये निवड झाल्यामुळे शहर व उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. कोथरूड शहराला पुण्याचे फ्लोटिंग उपनगर संबोधले जाते. वाढत्या उपनगरामुळे अनेक समस्यांनीसुद्धा डोके वर काढले आहे. लोकसंख्येच्या तुलनेने पोलीस संख्याबळ फारच कमी आहे. अश्यावेळी पोलीस मित्रांची फार मोठी मोलाची मदत पोलीस विभाग तसेच नागरिकांनाही मिळत आहे. दिवसेंदिवस त्यांचा सहभाग वाढत आहे ही शहराला भूषनिय बाब आहे.”
पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी म्हणाल्या,” सध्या शहरात शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे.त्यामुळे कोथरूड विभागात वाहतूक नियोजनासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची सतत धावपळ सुरू असते, अश्या प्रसंगी या पोलीस मित्रांची मदत कर्मचाऱयांना मिळत असते. दुचाकीधारकांनी हेल्मेटच्या वापराकडे सक्तीने न पाहता अत्यावशक सुरक्षा साधन म्हणून पहावे, म्हणजेच हेल्मेट वापरणाऱ्यांच्या संख्येत नक्कीच वृद्धी होईल. कारण कोथरूड विभागात गेल्या वर्षभरात ११८ जणांचा दुचाकी अपघातात बळी गेला आहे, ही चिंतेची बाब आहे. पोलीस मित्रांनी हेल्मेट जागृती मध्ये सहभागी व्हावे.”
विभागीय अध्यक्ष नाना कुंबरे म्हणाले,” गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात रात्रगस्त उपक्रम, प्रमुख चौकातील वाहतूक नियमन, पालखी सोहळा तसेच गणेशोत्सव बंदोबस्त, शालेय विद्यार्थी सुरक्षा जनजागृती अभियान अश्या विविध सामाजिक उपक्रमात कोथरूड विभागातील पोलीस मित्र सहभागी होत असतात. यामुळे पोलीस यंत्रणेचा बंदोबस्त अतिरिक्त ताण मोठ्या प्रमाणात कमी होतो.”
उपनिरीक्षक प्रविण जर्दे म्हणाले,” सध्या हिवाळ्यातील रात्र गस्त बंदोबस्तासाठी पोलीस मित्र मोलाची मदत करीत आहे त्यामुळे गुन्हेगारीला मोठया प्रमाणात आळा बसलेला आहे.” पोलीस मित्र मेळाव्यामध्ये नवीन नियुक्त झालेल्या पोलीस मित्रांना उपस्थित अधिकारी आणि प्रमुख पाहुण्यांच्या वतीने ओळ्खपत्राचेही वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास विशेष परिश्रम गणेश वरपे, नवनाथ जाधव, संजय तोंडे, सुरेश काळे, कमलाकर भोंडे, सुशिल केसकर, हृषीकेश साळी, सुनिता भगत, सुरेखा काळभोर, वैशाली पवळे, गौरी कुंबरे, सुरेखा जगताप, जया शेखावत, मनीषा भुरुख, स्मिता कुंबरे, सुवर्णा भोईणे, सीमा सावंत, रश्मी कोंढरे, सुवर्णा जाधव, सुनिल सुतार, संदिप जाधव, राहुल जाधव, प्रवीण कडु, निवृत्ती सपकाळ, मयुर सुर्वे, दिलीप यादव, दत्ता शिंदे, गणेश वाशिवले, शिवाजी लोहार, कल्लाप्पा डोंगरे, ज्ञानेश्वर तोंडे यांनी घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती अध्यक्ष विजय पाटील यांनी केले. सूत्र संचालन बाळकृष्ण नेहरकर यांनी तर आभार प्रदर्शन उमेश कांगुडे यांनी केले.












