- नगरसेविका गायकवाडांच्या प्रयत्नातून वाकडकरांना विकासकामांची भेट- महापौर माई ढोरे..
- वाकडमधील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२१) :- वाकड-कस्पटे वस्ती परिसरातील कुस्ती संकुल, जिम, फुटबॉल टर्फ मैदान, ज्येष्ठ नागरिक विरंगुळ केंद्र अशा विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या शुभहस्ते आज पार पडला. यावेळी वाकड परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरपालिकेमार्फत प्रथमच वाकड परिसरात साकारण्यात आलेले भव्य कुस्ती संकुल व फुटबॉल टर्फ मैदान हे येथील तरुणांचे विशेष आकर्षण ठरले व ज्येष्ठ नागरिकांकरीता सुसज्ज व अद्ययावत नागरिक विरंगुळा केंद्र साकारण्यात आले आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी आवर्जून या सोहळाकरिता उपस्थिती दर्शविली.
वाकड परिसरात महानगरपालिकेमार्फत होत असलेले कुस्ती संकुल हे अद्ययावत पद्धतीने साकारण्यात आले असून यामध्ये मातीतील कुस्ती व मॅट वरील कुस्ती असे दोन्ही प्रकार उपलब्ध करण्यात आलेले आहे. तसेच सुसज्ज अशी जिम देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांकरिता उभारलेल्या विरंगुळा केंद्रात चालण्याकरिता व व्यायामाकरिता सिंथेटिक मॅट, प्रशस्त हॉल, स्टेज, लहान मुलांसाठी खेळण्याकरिता साहित्य उपलब्ध केलेले आहे, हे सर्व पाहण्याकरिता नागरिकांनी विशेष गर्दी केली.
महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या की, “वाकड परिसरातील नगरसेविका ममताताई विनायक गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून महानगरपालिकेमार्फत होत असलेल्या या सर्व विकासकामांमुळे वाकडच्या विकासात व वैभवात मोठी भर पडलेली आहे. पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच अशी संकल्पना राबवून विकासकामे करून घेतली, त्यामुळे हा वाकडचा परिसर शहरात स्मार्ट प्रभाग होणार याबाबत शंका नाही. ”
स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व नगरसेविका ममताताई विनायक गायकवाड म्हणाल्या की, “नागरिकांना दिलेला शब्द व केलेला संकल्प आज पूर्ण होताना मनस्वी समाधान वाटत आहे. आपण सर्वांनी दिलेली साथ व पाठींबा याबद्दल मी सर्व नागरिक बंधू भगिनींची ऋणी आहे. २०१८ साली स्थायी समितीच्या अध्यक्ष काळात ही सर्व विकासकामे मंजूर करून घेतली. त्यासाठी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले, त्यामुळे ही सर्व विकासकामे करता आली.”


















