- फरार आरोपींच्या शोधासाठी सहा पथके रवाना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२१) :- पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेसह नऊ जणांविरोधात तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत मिरवणूक काढल्याप्रकरणी वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, हे समजताच आरोपी साथीदारासह गजानन मारणे फरार झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता त्या सर्व फरार आरोपींच्या शोधासाठी सहा पथके रवाना करण्यात आल्याचे पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बोलताना सांगितले.
तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत गुंड गजानन मारणे याने मिरवणूक काढली. या मिरवणुकीच्या व्हिडिओबद्दल राज्यात एकच चर्चा झाली होती. त्यावर पोलिसांनी कारवाई करीत करोनाबाबतचे नियम धुडकावणे, दहशत निर्माण करणे अशा स्वरूपाचे गुन्हे कोथरूड, हिंजवडी, तळेगाव दाभाडे, खारघर या पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले आहेत.


















