न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसें.) :- पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे तीन लाख २१ हजार ४८६ बालकांनी सोमवारपर्यंत (दि.१७) गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला. या मोहिमेमध्ये सहा लाख १६ हजार १९३ बालकांना लस देण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच अद्यापही ज्यांनी लसीकरण केले नाही. त्यांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन, महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
या मोहीमेंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणासाठी महापालिका आणि खासगी शाळा, तसेच अंगणवाडी, बालवाडी, नर्सरी आणि महापालिका रुग्णालयांमध्ये १०१८ सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत शहरातील तीन लाख २१ हजार ४८६ बालकांना या गोवर-रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली.
या लसीकरण मोहीमेसाठी सर्व वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, महापालिका व खाजगी शाळेतील शिक्षक, तसेच स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले, असे वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे आणि महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी सांगितले आहे.










