- शहरात आज ५०२ जणांना बाधा; चौघांचा मृत्यू तर, ३५९ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. मार्च. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. ४ मार्च) रोजी ५०२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ३५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनाने पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष – दापोडी (६९ वर्षे), वाकड (६४ वर्षे), थेरगाव (७१ वर्षे), पिंपळे गुरव (५९ वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०७२३० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०१४५९ वर पोहोचली आहे.
आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८५४ जणांचा मृत्यू झालेला आहे. आज प्रभागनिहाय रुग्णसंख्या अ – ५७, ब – ८२, क – ६५, ड – १०४, इ – ६६, फ – ४९, ग – ३४, ह – ४५ एकुण – ५०२ अशी आहे.
















