- गुरुद्वारा चौकात तीन मजली अनधिकृत व्यावसायिक इमारतीवर हातोडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व अतिक्रमण पथकाच्यावतीने गुरुद्वारा चौकातील २००० चौरस फुटांत उभी करण्यात आलेली तीन मजली अनधिकृत व्यावसायिक इमारतीवर तीन जेसीबी, दोन पोकलेन व ब्रेकरच्या साहाय्याने कारवाई करीत इमारत भुईसपाट केली.
परिसरात अनेक नागरिकांनी व्यावसायिक वाढीव बांधकामे केली आहेत. अशा अनधिकृत बांधकामावर अतिक्रमणाची कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. बुधवारी (दि. ३) रोजी अशाच प्रकारे कारवाई करीत दोन इमारती भुईसपाट केल्या होत्या.
प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व अतिक्रमण पथकाच्या वतीने गुरुद्वारा चौकाजवळ आलेले तीन मजली इमारत जमीनदोस्त केली. या परिसरातील सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर जेसीबी व ब्रेकरच्या साहाय्याने चिंचवड पोलीस स्टेशनचे अधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्या बंदोबस्तात कारवाई केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता वाहतूक विभाग चिंचवड आणि पोलीस स्टेशन चिंचवड यांनी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
















