- वेश्याव्यवसाय प्रकरणी एकाला अटक; महिला व तृतीयपंथियाची सुटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मार्च. २०२१) :- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर काळभोर नगर येथील जय टॉवरमधील तिसऱ्या मजलवर काव्यांजली स्पा सेंटर आहे. त्या स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने खातरजमा करून स्पा सेंटरवर छापा मारला असता तिथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी एका महिला आणि एका तृतीयपंथियाची सुटका केली. सामाजिक सुरक्षा पथकाने एका स्पा सेंटरवर छापा मारून गुरुवारी (दि. ४) सायंकाळी ही कारवाई केली आहे.
दर्पण दिलीप कुमार (वय ३२, रा. काळेवाडी. मूळ रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
















