- सहा बांधकामे पालिकेकडून भुईसपाट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ . मार्च २०२१) :- महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामविरोधी कारवाई तीव्र करण्यात आली असून, पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक २९ मधील सहा बांधकामे भुईसपाट करण्यात आली. महापालिकेच्या वतीने आठही प्रभागांत अनधिकृत बांधकामाविरोधी कारवाई सुरू आहे.
कारवाईमध्ये पिंपळे गुरव येथील ६ अनधिकृत आरसीसी बांधकामे अंदाजे क्षेत्रफळ आठ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ही कारवाई केली. त्यात कार्यकारी अभियंता सुनील भागवानी यांचा समावेश होता. तर या कारवाईसाठीर पोकलेन मशीन, २ जे.सी.बी, १ ट्रक, ३ ब्रेकर अशी यंत्रणा तसेच ३५ मनपा पोलीस कर्मचारी असा फौजफाटा तैनात होता.















