- मास्कचा वापर बंधनकारक करण्याचे पोलिसांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. मार्च २०२१) :- कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहेत, असे असतानाही काही नागरिक विनामास्क फिरत असल्याचे दिसून येते. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.
शहरातील ३०९ विनामास्क नागरिकांवर मंगळवारी (दि. १६) पोलिसांनी कारवाई केली. कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी काही निर्बंध घालून देण्यात आले असून, नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचे नागरिकांनी पालन करून खबरदारी घ्यावी, सुरक्षेच्या साधनांचा वापर करावा, असे आवाहन केले जात आहे. मात्र, तरीही काही नागिरक त्याकडे दुर्लक्ष करून विनाकारण घराबाहेर पडत असून, मास्कचा वापर करीत नसल्याचे समोर आले आहे.
अशा बेशिस्त नागरिकांवर कारवाई केली जात आहे. पोलिसांनी भोसरी (३१), पिंपरी (०८), निगडी (२९), आळंदी (३५), चाकण (३१), दिघी (१७), सांगवी (२०), वाकड (३४), हिंजवडी (१७), देहूरोड (१५), तळेगाव दाभाडे (०२), चिखली (४९), रावेत चौकी (०६), शिरगाव चौकी (१५), अशा एकूण ३०९ जणांवर मास्कचा वापर केल्याप्रकरणी कारवाई केली.















