- समस्या तात्काळ मार्गी लावण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. मार्च २०२१) :- शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या कामासाठी विविध ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यांची लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यायला हवी. त्याशिवाय, शहरात सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.
नागरिकांना विविध भागामध्ये अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याबाबत स्थायी समिती सदस्यांनी बुधवारी (दि. १७) स्थायी समिती सभेत अधिकाऱ्यांवर आगपाखड केली.
पाणीपुरवठा आणि रस्त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. याबाबत दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी भूमिका स्थायी समिती सदस्यांनी घेतली. महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात स्थायी समिती सभा झाली. या सभेमध्ये अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.















