- स्पाइसजेट खासगी विमान कंपनीची घोषणा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. मार्च २०२१) :- खासगी विमान कंपनी स्पाइसजेट (SpiceJet) २८ मार्चपासून पुण्यातून पाच मोठ्या शहरांसाठी नॉन स्टॉप विमानसेवा सुरू करत आहे. दरभंगा, दुर्गापूर, ग्वाल्हेर, जबलपूर आणि वाराणसी या पाच शहरांसाठी पुण्यातून विमानसेवेला लवकरच सुरूवात होणार आहे.
मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय. कंपनीने एका निवेदनाद्वारे याबाबत माहिती दिली. कंपनी किमान ६६ नवीन फ्लाईट्स सुरु करणार आहे. शिवाय काही विशिष्ट मार्गासाठी अधिकच्या फ्लाईट सुरु करण्यात येतील. २८ मार्चपासून ही सेवा सुरु होईल.















