- प्रत्येकाकडून उपलब्ध पाण्याचा योग्य वापर व्हावा – डॉ. दीपक शहा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२१) :- जागतिक जल दिनाचे औचित्य साधून चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालयाने ऑनलाईन माध्यमातून ‘जलदिन‘ साजरा केला.
यावेळी कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, प्रमुख प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, केंद्र प्रमुख प्रा. हेमलता चव्हाण, मुख्य संयोजिका प्रा. स्नेहल वराडे समवेश प्राध्यापक, विद्यार्थी आदींनी सहभाग नोंदविला.
जागतिक जल दिनानिमित्त विद्यार्थ्यानी आपापल्या घरीच रांगोळी, पोस्टर, पावरपॉईंट सह प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून पाण्याचे महत्व विशद केले. त्यात विद्यार्थ्यांनी गाड्या धुताना, पाईप ऐवजी बादलीचा वापर करावा, पावसाळ्यात आपल्या घराच्या आसपास पाणी साचेल याची दक्षता घ्यावी, घरात अंघोळ करताना शॉवर ऐवजी बादलीचा वापर करावा येणार्या पिढीसाठी पाणी का वाचवायचे घरातील धुण्या-भांड्याच्या वापरानंतर पाणी झाडांना कसे वापरता येईल.
कोरोना काळात पाणी व साबणानेच वारंवार हात धुवून कोरोना पासून बचाव कसा करावा, पाण्याची बचत कशी करावी, घरात पाण्याची गळती होत असेल तर, तात्काळ कशी थांबवावी आदीं बाबतीत रुचिता जाधव, आदेश पाटील, प्रिती ननवरे, दीक्षा धर्माधिकारी, प्रिया पारधी, किरण शेळके, मृणालिनी काकडे, निखिता शिंदे, ओमकार कुलकर्णी, समर्थ मठ, दिलीप कुमार, कोमल नाईकवडे आदींनी भाषण, रांगोळी, पोस्टर आदींच्या माध्यमातून पाणी बचतीचा संदेश दिला.
कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा मार्गदर्शन करताना म्हणाले, राज्य शासन, महापालिका पाणी बचाव, पाण्याचा योग्य वापर, पाण्याची होणारी गळतीबाबत विविध उपक्रमे राबवित असतातच परंतु, एक जागरूक नागरिक म्हणून आपले देखील पाणी बचतीबाबत पाण्याचा अतिरिक्त अपव्यय कसा टाळता येईल. यासाठी सदैव दक्ष राहून आपले कर्तव्य बजावले पाहिजे. प्रत्येकाने उपलब्ध पाण्याचा योग्यच वापर केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी पाणी बचतीचा संकल्प केला, याबाबतही त्याचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना केंद्र प्रमुख प्रा. हेमलता चव्हाण यांनी केली. सूत्रसंचालन संयोजिका प्रा. स्नेहल वराडे यांनी तर आभार विद्यार्थी निखील मिश्रा यांनी मानले.