- पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाकडून कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२१) :- दोन वर्षांसाठी पुणे जिल्हा व पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार केलेले असतानाही आरोपी शहरात वावरत असल्याचे समोर आले. त्याला पोलिसांनी दापोडी येथून अटक केली.
पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने बुधवारी (दि.२४) ही कारवाई केली. सागर दत्ता चांदणे (वय २१, रा. महादेव आळी, खडकी), असे अटक केलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. गुंडा विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी विजय दत्तात्रय तेलेवार यांनी बुधवारी (दि. २४) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
















