- महिलेविरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२१) :- चांगल्या नोकरीचे पर्याय देते, असे सांगून महिलेने डेबिट कार्डची माहिती घेतली. त्यानंतर बँकच्या खात्यातून ४२ हजार रुपये काढून घेतले. पूर्णानगर, चिंचवड येथे १८ मार्च रोजी फसवणुकीचा हा प्रकार घडला.
हरिशचंद्र रामचंद्र भालेराव (वय ४०, रा. पूर्णानगर) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शगुन (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), या महिला विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीत फिर्यादी यांना चांगल्या नोकरीचे पर्याय देते, असे सांगितले.
फिर्यादीचा विश्वास संपादन करून मोबाइलवर लिंक पाठवली. फिर्यादीने त्या लिंकवर जाऊन त्यांची माहिती भरून आरोपी महिलेने सांगितल्याप्रमाणे शंभर रुपये भरण्यासाठी फिर्यादीने त्यांच्या डेबिट कार्डची माहिती लिंकवर दिली. त्यानंतर त्यांच्या बँकेच्या खात्यातून ४९ हजार रुपये काढून घेतले.
















