- १५ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२१) :- पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी होऊन दोन्ही गटांनी एकमेकांवर खुनी हल्ले केले. गंगानगर, आकुर्डी येथे मंगळवारी (दि. २३) रात्री ही घटना घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन्ही गटातील १५ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात रोशन छबुराव काळे (वय ३४, रा. गंगानगर, आकुर्डी) यांनी बुधवारी (दि.२४) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बालाजी सातपुते, योगेश मानकेरे, श्रेयस टाकळकर, रोहित ओवाळ, आदित्य यादव, शुभम दत्तात्रय जाधव (सर्व रा. गंगानगर, आकुर्डी) आणि त्यांचे तीन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार आरोपी सातपुते आणि मानकेरे हे दोघे जण गंगाई उद्यानात नशापान करीत होते. त्यावेळी फिर्यादीने त्यास हटकले. तसेच शनिवारी (दि. २०) झालेल्या वादात मध्यस्थी केली. या रागातून आरोपीने साथीदारांच्या मदतीने फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयता व सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण करून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
दुसर्या प्रकरणात शुभम दत्तात्रय जाधव (वय २१, रा. गंगानगर, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भूषण काळे, रोशन काळे, साहिल काळे, सागर कान्हूरकर, राहुल कान्हूरकर, प्रदीप गुजर, (सर्व रा. गंगानगर, आकुर्डी), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शतपावली करण्यासाठी फिर्यादी घराबाहेर आले. सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
















