न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २४ डिसें.) :- नवी सांगवी येथील कै. दशरथ उर्फ बापू शंकर ढम (पवार) यांचे शनिवार (दि. २२) रोजी सायं ५ वाजता वयाच्या ८४ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
ते पुणे शहर येथील पोलीस दलात निवृत्त माजी पोलीस अधिकारी होते. चिखली-साने चौक येथील सामाजिक कार्यकर्ते अजय साने यांचे ते आजोबा होत. त्यांचा दशक्रिया विधी सोमवार (दि. ३१) रोजी सकाळी ९ वाजता नवी सांगवी येथे होणार आहे.










