न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसें.) :- दिवसेंदिवस भाजपच्या नेत्यांना बेताल वक्तव्ये करण्याची सवयच लागली आहे. जबाबदार पदावर आरूढ झालेल्या या नेत्यांना त्याचे कोणतेही सोयरसुतक राहिलेले दिसत नाही. असाच काहीसा प्रत्यय पून्हा एकदा आला आहे.
भाजपचे जेष्ठ नेते व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या जीभेचा ताबा पून्हा एकदा सुटला आहे. देशातील व राज्यातील सिंचन व्यवस्थेवर भाष्य करताना त्यांची जीभ पून्हा एकदा घसरली आहे. ”एकवेळ हिजड्याशी लग्न केल तर, त्याला मुलं होतील; पण, सिंचन योजना काही पूर्ण होणार नाहीत” या स्वरूपाचे वक्तव्य केले आहे. या विधानाने नागरिकांच्या भुवया उंचावल्या असून, गडकरींच्या या वक्तव्याचा शिवसेना तिरोडा-विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले यांनी खरपूस समाचार घेत, त्यांना बांगड्या भेट देण्याचा इशारा दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी, तृतीयपंथीयांबद्दल अपशब्द वापरणा-या भाजपच्या जबाबदार नेत्याने असे बोलणे अशोभनीय आहे. नितीन गडकरींनी तृतीयपंथीयांची तात्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा शिवसेना स्टाईल दाखवत बागड्यांचा हार भेट देणार असल्याचे, दाखले यांनी म्हटले आहे. या प्रसिद्धीपत्रकावर युवराज दाखले, गणेश आहेर, दत्ता गिरी, गणेश पाडुळे, मारूती मस्के, बाळासाहेब गायकवाड, सारीका तामचिकर, सुनिता खंडाळकर, रत्नप्रभा नवगिरे यांच्या सह्या आहेत.















