न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. २४ डिसें.) :- रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धा शाळेच्या मैदानात घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेच्या मुख्याध्यापिका श्राबनी पत्रनाभिष, मंजुळा मुदलियार, क्रीडा सर आशिष पांडे तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, रहीम शेख, विद्यार्थी, पालक उपस्थित होते .
यावेळी १०० मी, २०० मी. धावण्याची स्पर्धा, सँक रेस, सुई -धागा, स्कीपिंग, रेडी फॉर स्कुल, केळी खाणे स्पर्धा, बटाटे रेस, बकेट बॉल, रँबीट जम्प, बुक बँलन्सिंग, स्लो सायकलींग, वॉटर फिलिंग, कबड्डी स्पर्धा, क्रिकेट इ. स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व स्पर्धकांनी आपले कौशल्यपणाला लावून विजेते पद मिळवले. सर्व शिक्षकांनी प्रोत्साहन दिले.










