न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. २४ डिसें.) :- रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ख्रिसमस पार्टी उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेच्या मुख्याध्यापिका श्राबनी पत्रनाभिष, मंजुळा मुदलियार, चर्च ऑफ लिविंग गॉड मधील पास्टर ऐजरा आणि त्यांची टीम उपस्थित होते.
शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी विद्यार्थ्यांना येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी माहिती तसेच नाताळाचे महत्व समजावून सांगितले. शेवटी सांताक्लॉजच्या हस्ते केक कापून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी या पार्टीचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी नाताळ सणाबद्दल माहिती सांगितली. येशूच्या गीतांवर चर्च ऑफ लिविंग गॉड मधील पास्टर ऐजरा आणि त्यांच्या टीम सोबत विद्यार्थ्यांनी गीत गायन, नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजिता महातो यांनी केले तर पाहुण्यांचे आभार हर्षदा काकडे यांनी केले.










