- पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शनिवारी ३४० जणांवर कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२१) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न लावता फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. शनिवारी (दि. २४) पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत मास्कच्या आदेशाचा भंग करणाऱ्या ३४० जणांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यात सर्वाधिक हिंजवडी व पिंपरी परिसराचा समावेश आहे
नागरिकांनी मास्क वापरावा, असे आवाहन पालिका, पोलिसांकडून केले जात आहे. मात्र, त्याचे उल्लंघन केले जात आहे. मास्क न घालणाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई पुढीलप्रमाणे: एमआयडीसी भोसरी (३१), भोसरी (९), पिंपरी (६५), चिंचवड (१८), निगडी (१६), आळंदी (५), चाकण (१८), दिघी (८), सांगवी (१४), वाकड (५), हिंजवडी (८४), तळेगाव दाभाडे (८), चिखली (८), रावेत चौकी (७), शिरगाव चौकी (२६).