- मतदानाचा टक्का वधारला..
- सर्वाधिक उरण तर, सर्वात कमी पनवेल आणि त्याखालोखाल पिंपरीत मतदान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२४) :- मावळ लोकसभा मतदार संघात १४ लाख ८१ हजार ४३९ मतदारांनी मतदानांचा हक्क बजावला आहे. मतदारसंघातील एकूण लोकसंख्येपैकी ५४.८७ टक्के मतदारांनी मतदान केले. त्यात एकूण पुरूष मतदारांपैकी ७ लाख ७७ हजार ७४२ मतदारांनी हक्क बजावला तर ६ लाख ४० हजार ६५१ महिला मतदारांनी हक्क बजावला. प्रशासनाने मंगळवारी ही टक्केवारी जाहीर केली. रात्री सातनंतर झालेल्या मतदानात दोन ते अडीच टक्क्याने मतदान वाढल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
किरकोळ तांत्रिक अडचणी आणि शाब्दिक वाद वगळता मतदान शांततेत झाले. लोकसभेच्या या निवडणुकीत मतदारांमध्ये प्रचारातील निरुत्साह उतरल्याचे दिसून आले. गेल्या निवडणुकीत मावळमध्ये ५९.५७ टक्के मतदान झाले होते. मात्र, यावर्षी तेवढीही टक्केवारी गाठता आली नाही. एकूण ३३ उमेदवार रिंगणात होते; परंतु मुख्य लढत महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे आणि महायुतीचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यातच झाली. येत्या ४ जूनला म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये मतमोजणी केली जाणार आहे.
मतदारसंघात १७३ तृतीयपंथी मतदार होते. त्यापैकी फक्त ४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पनवेलमध्ये २०, कर्जत एक, उरण ४, मावळ १, चिंचवड ५ पिंपरी १५ तृतीयपंथी मतदारांनी मतदान केले.
विधानसभानिहाय एकूण मतदान…
पनवेल : ५०.०४
कर्जत : ६१.३९
उरण : ६७.०७
मावळ : ५५.४२
चिंचवड : ५२.१९
पिंपरी : ५०.५५
एकूण : ५४.८७











