- पिंपरीनंतर आता चिंचवड बाजारपेठेतील रस्ते बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मे. २०२१) :- पिंपरी बाजारपेठेतनंतर पोलिसांनी चिंचवड येथील भाजी मंडई व बाजारपेठेतील रस्ते बॅरिकेड्स लावून बंद केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेतील होणारी गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने पोलिस आयुक्तांनी शहरातील प्रमुख तीन बाजारपेठेतील रस्ते बंद केले आहेत.
तेथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, महापालिकेचे कर्मचारी देखील तैनात असणार आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत ग्राहकांना रितसर प्रवेश फि भरुन आत जाता येणार आहे. तर, नियम मोडणाऱ्यांवर पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
पिंपरी येथे गेल्या दोन दिवसांपासून हा नवीन प्रयोग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे पिंपरीतील विनाकारण होणारी गर्दी जवळपास निम्म्याहून कमी झाल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने इतरही बाजारपेठेत रस्ते बंद करण्यात आले आहेत. परिणामी, बाजारपेठेत होणारी विनाकारण गर्दी व वर्दळ कमी होणार आहे.