- रोकडही लंपास, चिंचवडमधील घटना; आरोपींना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मे. २०२१) :- हप्ता का दिला नाही या कारणावरून आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून दुकानातील अडीच हजार रुपये बळजबरीने चोरून नेले. जाताना दुकानाजवळ जमा झालेल्या लोकांना मोठमोठ्याने शिवीगाळ करून हातातील कोयते नाचवत जर कोणी पुढे आले तर तोडून टाकेल, अशी धमकी देत दहशतीचे वातावरण निर्माण केले.
फिर्यादी आणि त्यांचा भाऊ भंगाराच्या दुकानात बसले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. ही घटना मंगळवारी (दि. ४) दुपारी मोरयानगर, चिंचवड येथे घडली. यासीम याकुब शेख (वय २४, रा. मोरया नगर चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अण्णा हजारे रा. वेताळ नगर चिंचवड, अमित उर्फ गोट्या अण्णा जाधव, महादु वाघमारे, रा. लिंक रोड चिंचवड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.