- तरुणीसह आई व मैत्रिणीला लथाबुक्क्यांनी मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मे. २०२१) :- बेडरूमचा दरवाजा तोडून आत येऊन त्याने फिर्यादीचा विनयभंग केला. ‘तुला खूप माज आला आहे का. तुला माझ्या सोबत राहायचे नाही का. थांब तुला आता बघतो’ अशी धमकी देऊन त्याने फिर्यादी आणि त्यांच्या आईला लथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिथेच असलेल्या फिर्यादी यांच्या मैत्रिणीला ‘तू जर मध्ये आलीस तर तुला एका बुक्कीत ठार मारीन’ अशी धमकी दिली.
आरोपी हा फिर्यादी यांच्या तोंडओळखीचा आहे. फिर्यादी यांनी त्याच्यासोबत रिलेशन ठेवावे यासाठी तो सतत फिर्यादीवर पाळत ठेऊन त्यांचा पाठलाग करत होता. फिर्यादी यांनी रिलेशन ठेवण्यासाठी आरोपीला नकार दिला. त्यावरून आरोपी फिर्यादी यांच्या घरी आला.
हा प्रकार सोमवारी (दि. ३) रात्री वाकड येथे घडला. याबाबत २९ वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिजित मधुकर शिंगण (वय २८, रा. पिंपळे निलख, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.