न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. मे. २०२१) :- कामगारांच्या पगारासाठी आणलेली ६० लाखांची रोकड बनावट चावीने कपाट उघडून चोरून नेली. याप्रकरणी आचाऱ्यासह (कुक) त्याचा भाऊ व वडील यांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. आरोपींकडून ४५ लाख ६९ हजार ५०० रुपयांची रोकड हस्तगत केली. पिंपरी पोलिसांनी ही कामगिरी केली.
अनोदकुमार राजकुमार यादव (वय २८), राजकुमार मुनीश्वर प्रसाद यादव (वय ५४) आणि अंकीत राजकुमार यादव (वय २६), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मुख्य आरोपी अनोदकुमार याचा आणखी एक भाऊ अनुज राजकुमार यादव (वय २२, सर्व रा. कुमाडान्डा, सदरापूर, बाराबंकी, उत्तर प्रदेश) हा अद्याप फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. अजित संजयकुमार राजहंस (वय ३१, रा. महिंद्रा अँथिया सोसायटी, गांधीनगर झोपडपट्टीसमोर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात २९ एप्रिलला फिर्याद दिली आहे.