- वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. मे. २०२१) :- महिलेला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. तसेच आरोपी पती याने विवाहितेच्या डोक्याला रिवॉल्वर लावून तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच जबरदस्तीने तिचा गर्भपात केला.
विवाहितेच्या इच्छेविरोधात पतीने तिच्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवले. यास विरोध केला असता पतीने विवाहितेला मारहाण केली. आरोपी दिराने विवाहितेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार जुलै २०१९ पासून ६ मे २०२१ या कालावधीत थेरगाव आणि वाल्हेकरवाडी येथे घडला.
२३ वर्षीय विवाहितेने याप्रकरणी शनिवारी (दि. ८) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू, सासरे, दीर आणि जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.